sdo.akot@rediffmail.com 07256-243472

मा. मुख्यमंत्री यांचा १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम

26-05-2025
मा. मुख्यमंत्री यांचा १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम
मा. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत अमरावती महसूल विभागात मुरटिजापूर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी बजावून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख सेवा सुधारणा हे होता.अमरावती विभागातील विविध तालुका व उपविभाग कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. यात नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे, कार्यालयीन प्रक्रियेत सुधारणा करणे, विविध सेवा वेळेत देणे, कागदपत्रांच्या प्रक्रियेत डिजिटल माध्यमांचा वापर करणे या गोष्टींवर भर देण्यात आला होता.या स्पर्धात्मक मूल्यमापनात मुर्तीजापुर उपविभागाने विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हा सन्मान म्हणजे मुर्तीजापुर उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न आणि जनतेप्रती असलेली सेवा भावना यांचे प्रतिक आहे.या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण टीमचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे भविष्यातील प्रशासकीय कामकाजासाठी नवीन उर्जेला चालना मिळणार आहे.