sdo.akot@rediffmail.com 07256-243472

मुर्तीजापुर उपविभागीय कार्यालयाच्या नवीन वेबसाईटचे लोकार्पण – प्रशासन आता अधिक डिजिटल, पारदर्शक आणि जनसुलभ

26-05-2025
मुर्तीजापुर  उपविभागीय कार्यालयाच्या नवीन वेबसाईटचे लोकार्पण – प्रशासन आता अधिक डिजिटल, पारदर्शक आणि जनसुलभ
मुर्तीजापुर – मुर्तीजापुर उपविभागीय कार्यालयाच्या अधिकृत नवीन वेबसाईटचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या नवीन वेबसाईटमुळे नागरिकांना आता विविध शासकीय सेवा, माहिती आणि कागदपत्रे सुलभतेने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, “या वेबसाईटच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होणार आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी, अर्ज, कागदपत्र मागणी यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज भासणार नाही.” ही वेबसाईट आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात विभागीय माहिती, महत्त्वाच्या सेवा, विविध फॉर्म्स, तक्रार नोंदणी, निविदा, सूचना आणि महत्वाच्या योजनांची माहिती मराठी भाषेत सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाईटवर सतत अद्ययावत माहिती प्रदर्शित केली जाणार आहे.या डिजिटल पावलामुळे नागरिक आणि प्रशासन यामधील संवाद अधिक सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांमधूनही या पुढाकाराचे स्वागत करण्यात येत असून अनेकांनी वेबसाईटच्या वापराविषयी समाधान व्यक्त केले.